बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष
बुटीबोरी (नागपूर):
बुटीबोरी नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्र. ०८ मधील गौतम सोसायटी व रुक्मिणी टाऊनशिपचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अभिषेक सपाट घरापासून विलास महल्ले घरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून, ९ जुलै २०२५ आणि ७ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदने देऊनही पक्का काँक्रीट रस्ता बनलेला नाही. पावसाळ्यात चिखलामुळे शाळकरी मुले व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनानुसार ड्रीम स्कूल ते तुलसी सिटी (उमरेड रोड) मार्गावर रात्रीच्या वेळी पथदिवे (स्ट्रीट लाईट) नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी समस्त रहिवाशांनी केली आहे.
बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष





