Saturday, 24 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोषबुटीबोरी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नगराध्यक्ष सुमितजी मेंढे यांच्याशी विशेष संवादज्ञानदीप उत्सव मंडळातर्फे दसरा मेळावा उत्साहात संपन्नबुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजराबुटीबोरी नगर परिषद: प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य पाणीपुरवठा वाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वायाबुटीबोरीत ‘जय मां बोरी वाली’ मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन; भाविकांची मोठी उपस्थिती४७ ग्रॅम एमडी जप्त; चार आरोपी ताब्यात‘श्री विट्ठल रुक्मणी गरबा ग्रुप’ बना मराठा लायन्स रास गरबा २०२६ का विजेता; जीता ६१ हजार रुपये का प्रथम पुरस्कार!
BUTIBORI NEWS

बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष

Aamchibutibori_admin
24 Oct 2026106 वाचने

बुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष
​बुटीबोरी (नागपूर):
बुटीबोरी नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे प्रभाग क्र. ०८ मधील गौतम सोसायटी व रुक्मिणी टाऊनशिपचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अभिषेक सपाट घरापासून विलास महल्ले घरापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून, ९ जुलै २०२५ आणि ७ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदने देऊनही पक्का काँक्रीट रस्ता बनलेला नाही. पावसाळ्यात चिखलामुळे शाळकरी मुले व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
​तसेच, २४ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या निवेदनानुसार ड्रीम स्कूल ते तुलसी सिटी (उमरेड रोड) मार्गावर रात्रीच्या वेळी पथदिवे (स्ट्रीट लाईट) नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने तात्काळ रस्त्याचे काम सुरू करून पथदिवे बसवावेत, अशी मागणी समस्त रहिवाशांनी केली आहे.

संबंधित बातम्या