Tuesday, 20 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
ज्ञानदीप उत्सव मंडळातर्फे दसरा मेळावा उत्साहात संपन्नबुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजराबुटीबोरी नगर परिषद: प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य पाणीपुरवठा वाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वायाबुटीबोरीत ‘जय मां बोरी वाली’ मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन; भाविकांची मोठी उपस्थिती४७ ग्रॅम एमडी जप्त; चार आरोपी ताब्यात‘श्री विट्ठल रुक्मणी गरबा ग्रुप’ बना मराठा लायन्स रास गरबा २०२६ का विजेता; जीता ६१ हजार रुपये का प्रथम पुरस्कार!बुटीबोरी में गरबा की धूम: ‘मराठा लायन्स गरबा’ में शामिल हुईं ‘तारक मेहता’ फेम माधवी भिड़े (‘भिड़े मैडम’)सुकळी की महारानी का भव्य आगमन: सुकळी बेलदार एमआईडीसी में मां जगदंबा उत्सव मंडल ने की स्थापना, 18 साल से जारी है परंपरा
BUTIBORI NEWS

४७ ग्रॅम एमडी जप्त; चार आरोपी ताब्यात

Aamchibutibori_admin
19 Oct 202672 वाचने

बुटीबोरी : नागपूर-बुटीबोरी मार्गावरील बोथली फाटा येथे एमडीच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई १७ व १८ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आली. ४७.६२ ग्रॅम एमडी व तीन मोबाइल, असा एकूण दोन लाख ६८ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व नागपूर ग्रामीण पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक गस्तीवर असताना बोथली फाटा येथे एक व्यक्ती एमडी अमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. फिरोज इब्राहिम खान (३५, रा. बुटीबोरी), मोहसिन अब्दुल बेरा (३९, रा. बुटीबोरी), एहफज उर्फ लक्की अहमद खान (२६, रा. खरबी, नंदनवनजवळ, नागपूर) व फारुख मुलताज शेख (२५, रा. खरबी, नागपूर), अशी आरोपींची नावे आहेत. या कारवाईत दोन लाख ३८ हजार १०० रुपये किमतीचा ४७.६२ ग्रॅम एमडी व ३० हजार रुपये किमतीचे तीन मोबाइल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चनोर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश वानखडे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे व इतरांनी केली.

संबंधित बातम्या