बुटीबोरी : तालुकास्तरीय ‘माझा आवाज’ वक्तृत्व स्पर्धेत बुटीबोरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवी या गटातून संकल्प उमाशंकर देशमुख याने प्रथम क्रमांक पटकावला, तर इयत्ता सहावी ते आठवी या गटातून विपश्यना अमोल रामटेके हिने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढविला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी मा. डहाळे मॅडम यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीने, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि उत्कृष्ट विचारमांडणीने परीक्षकांची मने जिंकली.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या नावलौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरणार आहे.
या यशाबद्दल सौ. जयश्री आशिष हुसुकले तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



