खासदार श्यामकुमार बर्वे यांना राजू गावंडे यांचे निवेदन; कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी
बुटीबोरी (जि. नागपूर) : बुटीबोरी नगरपरिषद अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला असून, या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे महासचिव राजू गावंडे यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. श्यामकुमारजी बर्वे यांना २९ ऑक्टोबर २०२६ रोजी लेखी निवेदन सादर केले.




