Wednesday, 14 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
राईसोनी यूथ टेड टॉक्स स्पर्धा: इरा इंटरनेशनल स्कूल की भार्गवी मुरुडिया ने हासिल किया दूसरा स्थानमराठा लायन्स रास गरबा २०२६चा दुर्गा माता मंदिर मैदानात भव्य उत्सव; प्रथम पारितोषिक ६१ हजार रुपये!बुटीबोरी: केडीके इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने बॉल बैडमिंटन में लहराया परचमबुटीबोरी की सिडको कॉलोनी में हुई दुर्गा माता की प्राण प्रतिष्ठाजय माँ बोरीवाली मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; बुटीबोरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीआगामी त्योहारों के मद्देनज़र बुटीबोरी पुलिस का रूट मार्च; मुख्य चौक में दंगा नियंत्रण का मॉक ड्रिलरुई खैरी में 22 वर्षीय युवक ने की आत्महत्याबुटीबोरी में सिलाई के पैसे मांगने पर गटोई कारीगर की हत्या; चरमकार सेवा संघ ने की आरोपी पर सख्त कार्रवाई की मांग
BUTIBORI NEWS

मराठा लायन्स रास गरबा २०२६चा दुर्गा माता मंदिर मैदानात भव्य उत्सव; प्रथम पारितोषिक ६१ हजार रुपये!

Aamchibutibori_admin
14 Oct 20267 वाचने

बुटीबोरी  – सतीशजी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान रंगणार रास गरब्याचा उत्सव; गेल्या १५ वर्षांपासून परंपरा कायम

दुर्गा माता मंदिराच्या मैदानात सतीशजी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मराठा लायन्स रास गरबा २०२६ या भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात गरबाप्रेमींना उत्साह, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे.

मराठा लायन्स गरबा महोत्सवाचे हे आयोजन गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने करण्यात येत असून, या उपक्रमाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रास गरब्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या स्पर्धेसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक ६१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये, तर चतुर्थ पारितोषिक १५ हजार रुपये असेल.

गेल्या दीड दशकापासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही उत्साहात पुढे नेण्यात येत असून, मराठा लायन्स रास गरबा २०२६ हा नवरात्रोत्सवातील एक प्रमुख आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या