बुटीबोरी प्रतिनिधी: संविधान महोत्सव समिती आणि महाप्रज्ञा बुद्ध विहार, टाकळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टाकळघाट येथे संविधान महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सचिव निलेश गुल्हाने हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधनकार विकास राजां उपस्थित होते.
यासोबतच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, माजी जिल्हा परिषद सदस्य आतिशभाऊ उमरे, माजी सरपंच शारदाताई ज्ञानेश्वरजी शिंगारे, उपसरपंच उमेशराव कावळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानाचे विचार घराघरांत पोहोचवून सामाजिक समता आणि बंधुता अधिक बळकट करण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.



