Saturday, 28 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरी पुलिस की बड़ी सफलता; ‘सीईआईआर’ (CEIR) पोर्टल की मदद से 17 गुमशुदा मोबाइल मूल मालिकों को लौटाए गएबुटीबोरीतील स्व. नारायणराव वारघणे पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा; सामूहिक शपथविधी व चित्रकला स्पर्धेने वेधले लक्षविठ्ठल नामाच्या गजरात बुटीबोरीत काकड आरती आणि त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्नबुटीबोरी येथील शासकीय आयटीआयमध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्नकाठमांडू येथे भारताला सुवर्णपदक; बुटीबोरीच्या (भारकस) दोन्ही सुपुत्रांची सुवर्णकामगिरी!काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय शूटबॉल स्पर्धेसाठी भारकस येथील दोन खेळाडूंची निवड!बुट्टीबोरी मध्ये वर्धापन दिनानिमित्त आर्थिक बचतीवर मार्गदर्शनबोरखेडी (रेल्वे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवाळी स्नेहमीलन सोहळा उत्साहात
BUTIBORI NEWS

विठ्ठल नामाच्या गजरात बुटीबोरीत काकड आरती आणि त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात संपन्न

Aamchibutibori_admin
27 Nov 202664 वाचने

बुटीबोरी (प्रतिनिधी): येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण कार्तिक महिन्यात पहाटे भक्तिमय वातावरणात काकड आरती आणि त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात करण्यात आली.

संपूर्ण कार्तिक महिनाभर दररोज पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची काकड आरती नियमितपणे पार पडली. यानिमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्रिपुरारी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी मंदिरात भक्तिभावाने त्रिपूर पूजन, भजन आणि विशेष काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा अतिशय सुंदर आणि मनमोहक शृंगार करण्यात आला होता. तसेच संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.

या महिनाभराच्या काळात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसाने आणि ‘जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी’च्या नामघोषाने दुमदुमून गेला होता. या सोहळ्याला परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्सवाच्या माध्यमातून सर्व भाविकांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो व सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत, अशी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी करण्यात आली.

संबंधित बातम्या