Thursday, 15 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
टेंभरी येथील दुर्गा चौकात आज भव्य जागरणाचे आयोजन; सचिन दादा, मयुरी खंडारे व तेजस्विनी खोडतकर यांची उपस्थिती!बुटीबोरी सार्वजनिन बंगाली दुर्गा पूजा कमेटी का 12वां वर्ष: 14 अक्टूबर को हुई घटस्थापना, 21 अक्टूबर को वितरित होगा महाप्रसादबुटीबोरी एमआयडीसीमध्ये पांढऱ्या पाण्याचा प्रश्न आणि स्क्रॅप-कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार चर्चेतराईसोनी यूथ टेड टॉक्स स्पर्धा: इरा इंटरनेशनल स्कूल की भार्गवी मुरुडिया ने हासिल किया दूसरा स्थानमराठा लायन्स रास गरबा २०२६चा दुर्गा माता मंदिर मैदानात भव्य उत्सव; प्रथम पारितोषिक ६१ हजार रुपये!बुटीबोरी: केडीके इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने बॉल बैडमिंटन में लहराया परचमबुटीबोरी की सिडको कॉलोनी में हुई दुर्गा माता की प्राण प्रतिष्ठाजय माँ बोरीवाली मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; बुटीबोरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
BUTIBORI NEWS

टेंभरी येथील दुर्गा चौकात आज भव्य जागरणाचे आयोजन; सचिन दादा, मयुरी खंडारे व तेजस्विनी खोडतकर यांची उपस्थिती!

Aamchibutibori_admin
15 Oct 202631 वाचने

टेंभरी (बुटीबोरी MIDC) : नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ व व्यापारी संघटनेच्या वतीने टेंभरी येथील दुर्गा चौकात गुरुवार, दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी भव्य जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सचिन दादा, सुप्रसिद्ध गायिका मयुरी खंडारे आणि गायिका तेजस्विनी खोडतकर आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिगीतांची व देवीच्या गीतांची सुरेल मेजवानी सादर करणार आहेत.

सायंकाळी ६ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हा जागरण सोहळा रंगणार असून, परिसरातील भाविकांना भक्तिसंगीताचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ व व्यापारी संघटनेच्या वतीने सर्व भाविक, नागरिक आणि संगीतप्रेमींनी या जागरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या