बुटीबोरी (दि. १५ नोव्हेंबर २०२६):
आज औद्योगिक नगरी असलेल्या बुटीबोरी शहरात क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांना अत्यंत आदराने विनम्र अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील बिरसा मुंडा चौकात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी बुटीबोरी येथील उपस्थित सर्व समाजबांधव आणि ‘मराठा लॉयन्स ग्रुप’च्या सर्व मित्रमंडळींनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहली. तसेच उपस्थितांनी एकमेकांना क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बिरसा मुंडा यांच्या विचारांचा, कार्याचा आणि संघर्षाचा वारसा कायम पुढे चालवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला.



