बुटीबोरी : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील मोरारजी ते साळईधाबा मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या कामगाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुर्गेश नेवारे (वय 32, रा. सोनी, ता. गोरेगाव, जि. गोंदिया) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश हा बुटीबोरी येथील एका कंपनीत कामाला लागला होता. 13 नोव्हेंबर रोजी त्याची पहिली ड्युटी होती. सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजताच्या सुमारास तो पायी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. बुटीबोरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.



