Monday, 16 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
BUTIBORI NEWS

प्रबोधनाची पर्वणी: १९ नोव्हेंबरला बुटीबोरीत रंगणार सत्यपाल महाराजांचे सुश्राव्य कीर्तन!

Aamchibutibori_admin
15 Nov 202650 वाचने

बुटीबोरी: भारतीय जनता युवा मोर्चाचे बुटीबोरी शहराध्यक्ष प्रतीक भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात एका भव्य धार्मिक व प्रबोधनपर कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता, जुनी वस्ती, बुटीबोरी येथे प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण: या सोहळ्यात सत्यपाल महाराज आपल्या ओघवत्या वाणीतून आणि खंजेरीच्या तालावर समाजप्रबोधनपर विचार मांडणार आहेत. व्यसनमुक्ती, संतविचार आणि आजच्या तरुणाईसमोरील आव्हाने या विषयांवर महाराजांचे मोलाचे मार्गदर्शन बुटीबोरीकरांना ऐकायला मिळणार आहे.

उपस्थितीचे आवाहन: प्रतीक भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आध्यात्मिक आणि वैचारिक पर्वणीचा लाभ घेण्यासाठी भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बुटीबोरी आणि परिसरातील नागरिकांनी व वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या