Tuesday, 13 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरी: केडीके इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने बॉल बैडमिंटन में लहराया परचमबुटीबोरी की सिडको कॉलोनी में हुई दुर्गा माता की प्राण प्रतिष्ठाजय माँ बोरीवाली मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; बुटीबोरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दीआगामी त्योहारों के मद्देनज़र बुटीबोरी पुलिस का रूट मार्च; मुख्य चौक में दंगा नियंत्रण का मॉक ड्रिलरुई खैरी में 22 वर्षीय युवक ने की आत्महत्याबुटीबोरी में सिलाई के पैसे मांगने पर गटोई कारीगर की हत्या; चरमकार सेवा संघ ने की आरोपी पर सख्त कार्रवाई की मांगइरा इंटरनेशनल स्कूल ने जीता यू-17 जिला हॉकी खिताब, संभाग स्तरीय प्रतियोगिता के लिए किया क्वालीफाईबुटीबोरी में हजरत लोधी शाह बाबा का उर्स धूमधाम से संपन्न, उमड़ा आस्था का जनसैलाब
BUTIBORI NEWS

जय माँ बोरीवाली मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; बुटीबोरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Aamchibutibori_admin
12 Oct 202632 वाचने

बुटीबोरी: आदिशक्तीच्या उपासनेचा पावन पर्व म्हणजेच नवरात्रोत्सव बुटीबोरी परिसरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. येथील प्रसिद्ध ‘जय माँ बोरीवाली मंदिरात’ नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

पहाटे महापूजा आणि शास्त्रोक्त घटस्थापनेनंतर मंदिर परिसर ‘माँ अंबे’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उत्सवानिमित्त मंदिर परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई आणि भव्य फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सायंकाळी महाआरतीनंतर भजन-कीर्तन आणि दांडिया-गर्बाचे विशेष आयोजन केले जात असून, यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व सुरक्षा लक्षात घेता मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनातर्फे उत्तम नियोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या