बुटीबोरी | वार्ताहर
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विदर्भात भुलाबाईच्या परंपरेचा गोडवा आजही कायम आहे. घराघरांत भुलाबाई आणि भुलोजीची पूजा करून महिला व मुली पारंपरिक गीते गातात. या गीतांतून कौटुंबिक जीवन, नातेसंबंध आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.
भुलाबाईचा उत्सव हा विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, पिढ्यान्पिढ्या ही परंपरा जपली जात आहे. कोजागिरीच्या रात्री चंद्रदर्शन, लक्ष्मीपूजन आणि मसाला दूध प्राशन यामुळे उत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण होते. नव्या पिढीपर्यंत हा लोकपरंपरेचा वारसा पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.
कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अन् भुलाबाईच्या गीतांचा गोडवा; विदर्भाची लोकपरंपरा आजही कायम





