Monday, 26 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
‘वर्धमान सैनिकी’च्या मुलींची चमकदार कामगिरीकोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अन् भुलाबाईच्या गीतांचा गोडवा; विदर्भाची लोकपरंपरा आजही कायमयुवक की निर्मम हत्या , आरोपी गिरफ्तार, प्रेम प्रसंग में विवाद की आशंकाबुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोषबुटीबोरी शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नगराध्यक्ष सुमितजी मेंढे यांच्याशी विशेष संवादज्ञानदीप उत्सव मंडळातर्फे दसरा मेळावा उत्साहात संपन्नबुटीबोरीत धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजराबुटीबोरी नगर परिषद: प्रभाग क्रमांक २ मध्ये मुख्य पाणीपुरवठा वाहिनी फुटली; हजारो लिटर पाणी वाया
BUTIBORI NEWS

‘वर्धमान सैनिकी’च्या मुलींची चमकदार कामगिरी

Aamchibutibori_admin
26 Oct 202651 वाचने

जिल्हास्तरीय रिले, लांब उडी आणि कराटेमध्ये पदकांची कमाई

वडधामना येथील वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय रिले, लांब उडी आणि कराटे स्पर्धेत पदकांची कमाई करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

१९ वर्षे वयोगटात ४ बाय १०० मीटर रिले प्रकारात परी भगत, निर्मला जावरकर, अक्षरा कास्देकर आणि दिव्या उईके या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षे वयोगटातील लांब उडी स्पर्धेत राधिका चौधरी हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

१४ वर्षे वयोगटातील लांब उडी स्पर्धेत समीक्षा जाधव हिने तृतीय क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली. १९ वर्षे वयोगटात कराटेमध्ये साक्षिता मेटकर हिने प्रथम स्थान मिळवून शाळेचा मान वाढवला. सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संस्थाध्यक्ष प्रकाश सावळकर, मुख्याध्यापिका शारदा व्यास, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले. क्रीडा शिक्षक महेश येलुरे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक तीर्थराज गव्हाळे आणि संदीप हिवराळे यांचेही अभिनंदन केले असून, पुढील स्र्पोच्या शुभेच्छा दिल्या.

संबंधित बातम्या