Tuesday, 27 October 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरीत महिंद्राचा १५ हजार कोटींचा महाप्रकल्प; ८०० एकर जमिनीचा ताबाबुटीबोरी में नए बोरवेल की खुदाई पर प्रतिबंध! नगर परिषद ने सोशल मीडिया पर जारी किया सूचना फलकबुटीबोरी में वाहन की टक्कर से 62 वर्षीय व्यक्ति की मौतसिडको कॉलनीत दुर्गामातेचा भावपूर्ण निरोप; भक्तांच्या डोळ्यांत सुखाश्रू‘वर्धमान सैनिकी’च्या मुलींची चमकदार कामगिरीकोजागिरी पौर्णिमेचा चंद्र अन् भुलाबाईच्या गीतांचा गोडवा; विदर्भाची लोकपरंपरा आजही कायमयुवक की निर्मम हत्या , आरोपी गिरफ्तार, प्रेम प्रसंग में विवाद की आशंकाबुटीबोरीतील गौतम सोसायटीत रस्ता व पथदिव्यांचा प्रश्न गंभीर; प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमधे रोष
BUTIBORI NEWS

सिडको कॉलनीत दुर्गामातेचा भावपूर्ण निरोप; भक्तांच्या डोळ्यांत सुखाश्रू

Aamchibutibori_admin
26 Oct 202681 वाचने

सिडको कॉलनीत दुर्गामातेचा भावपूर्ण निरोप; भक्तांच्या डोळ्यांत सुखाश्रू
‘जय माता दी’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला; ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक..

बुटीबोरी (नितीन कुरई): सिडको कॉलनीतील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाची सांगता बुधवारी दिनांक २१ ऑक्टोबरला दुर्गामातेच्या भावपूर्ण विसर्जनाने झाली. दुपारी तीन वाजता ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शेकडो भक्त सहभागी झाले. ‘जय माता दी’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला. सायंकाळी सात वाजता भारकस नदीच्या तीरावर देवीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भक्तांच्या डोळ्यांत सुखाश्रू तरळले.
नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बालकलाकारांनी श्रीराम,लक्ष्मण,सीतामाता व हनुमान यांची वेशभूषा साकारली.महिलांनी आदिशक्तीच्या नऊ रूपांचे दर्शन घडविले.आकर्षक देखावे आणि विविध स्पर्धा हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
विजयादशमीनिमित्त श्रीराम दरबाराची शोभायात्रा काढून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
आमदार समीर मेघे व नगराध्यक्ष सुमित मेंढे यांनी मंडळाला भेट देऊन आयोजनाचे कौतुक केले. उत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाने सर्व भक्तांचे आभार मानले.

संबंधित बातम्या