Saturday, 7 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरीत ‘जाणीव माणुसकीची’ उपक्रमातून गरजूंना कपड्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश!पंचशील आचरणाने स्वतःचे जीवन घडवा : भदंत प्रज्ञानंदधनतेरस पर बुटीबोरी के मुख्य बाजार में उमड़ी खरीदारों की भीड़, छोटे व्यापारियों के चेहरे खिले!बुटीबोरी में कैंसर जांच एवं स्वास्थ्य परामर्श शिविर का आयोजनबुटीबोरी में 28 CCTV कैमरे बंद, तत्काल शुरू करने की मांगबुटीबोरीतील रस्त्याच्या कामाबाबत खासदार श्यामकुमार बर्वे यांना निवेदनबुटीबोरी की दो बेटियों का महाराष्ट्र अंडर-19 बालिका हॉकी टीम में चयनबुटीबोरीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण
BUTIBORI NEWS

बुटीबोरीत ‘जाणीव माणुसकीची’ उपक्रमातून गरजूंना कपड्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश!

Aamchibutibori_admin
07 Nov 202651 वाचने

बुटीबोरी : माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपण्याच्या उद्देशाने स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्था, बुटीबोरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘जाणीव माणुसकीची’ हा सामाजिक उपक्रम शनिवार, दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

स्व. किशोरभाऊ वानखेडे चौक, बुटीबोरी येथे सकाळी १० वाजता आयोजित या उपक्रमात गरजू नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष श्री. आकाश म. वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. केवळ मदत करणे नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने माणुसकीची जाणीव ठेवून गरजूंच्या मदतीसाठी पुढे यावे, हा या उपक्रमामागील मुख्य संदेश होता.

कपड्यांच्या वाटपातून सामाजिक संवेदनशीलता, आपुलकी आणि एकमेकांप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात मदतीची भावना वृद्धिंगत होऊन माणुसकीचे नाते अधिक दृढ होते.

स्व. किशोरभाऊ वानखेडे बहुउद्देशीय संस्थेचा हा उपक्रम सामाजिक कार्याच्या दिशेने एक कौतुकास्पद पाऊल ठरला.

संबंधित बातम्या