Friday, 20 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरीत सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजेरीचा निनाद; प्रबोधनाच्या जागराने श्रोते मंत्रमुग्ध!वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यूक्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ४ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमीबुटीबोरी में राष्ट्रीय पत्रकार दिवस उत्साह के साथ मनाया गया, पत्रकारों को पौधे देकर दी शुभकामनाएंबुटीबोरी में दर्दनाक हादसा: दस्तावेज़ों की गलती से परेशान डी.फार्मा छात्रा ने की आत्महत्याईमानदारी की मिसाल बने तंजील पठाण! लाखों का कीमती सामान मिला, फिर भी नहीं डगमगाया ईमान; PI निशांत मेश्राम के मार्गदर्शन में मालिक को लौटाया पर्स
BUTIBORI NEWS

बुटीबोरीत सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजेरीचा निनाद; प्रबोधनाच्या जागराने श्रोते मंत्रमुग्ध!

Aamchibutibori_admin
20 Nov 202680 वाचने

बुटीबोरी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे बुटीबोरी शहर अध्यक्ष प्रतिक मनोहरराव भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त बुटीबोरी शहरात भव्य कीर्तन व समाजप्रबोधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी संभाजी महाराज चौक, प्रभाग क्रमांक १०, जुनी वस्ती, बुटीबोरी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या प्रभावी कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करणारे प्रसिद्ध सप्तखंजेरी वादक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची उपस्थिती होती. सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत रंगलेल्या या कीर्तन सोहळ्यात सत्यपाल महाराज यांनी आपल्या खास शैलीत सप्तखंजेरीच्या तालावर समाजप्रबोधनाचा प्रभावी जागर केला.

आपल्या ओघवत्या वाणीने, विनोदी शैलीने आणि परखड विचारांनी महाराजांनी उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. समाजातील अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, शिक्षणाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि एकोपा यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी विचार मांडले. केवळ मनोरंजन न करता समाजाला योग्य दिशा देणारे विचार आपल्या कीर्तनातून मांडण्याची त्यांची शैली उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरली.

सप्तखंजेरीच्या निनादाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराजांच्या प्रत्येक विचाराला आणि प्रबोधनात्मक संदेशाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भक्ती, मनोरंजन आणि समाजप्रबोधन यांचा सुंदर संगम या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.

वाढदिवसाचे औचित्य साधून पारंपरिक पद्धतीने केवळ उत्सव साजरा न करता समाजाला प्रेरणा देणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. अशा सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमांमुळे समाजात जागृती निर्माण होण्यास निश्चितच मदत होते.

या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन प्रतिक भोयर व मित्र परिवार, बुटीबोरी यांच्या वतीने करण्यात आले होते. समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम बुटीबोरीकरांसाठी एक संस्मरणीय पर्व ठरला.

संबंधित बातम्या