Thursday, 19 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यूक्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ४ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमीबुटीबोरी में राष्ट्रीय पत्रकार दिवस उत्साह के साथ मनाया गया, पत्रकारों को पौधे देकर दी शुभकामनाएंबुटीबोरी में दर्दनाक हादसा: दस्तावेज़ों की गलती से परेशान डी.फार्मा छात्रा ने की आत्महत्याईमानदारी की मिसाल बने तंजील पठाण! लाखों का कीमती सामान मिला, फिर भी नहीं डगमगाया ईमान; PI निशांत मेश्राम के मार्गदर्शन में मालिक को लौटाया पर्सपतंग उडवायला गेलेला बालक परतला नाही! शेतात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; बुटीबोरी पोलीस ठाण्या हद्दीतील घटनाबुटीबोरीत क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ४ मध्ये विविध उपक्रमांनी विनम्र अभिवादन!
BUTIBORI NEWS

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यू

Aamchibutibori_admin
19 Nov 202636 वाचने

मामा गंभीर जखमी; सोनेगाव लोधी येथील घटना

बुटीबोरी, वार्ताहर. भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मामा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेदरम्यान नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव (लोधी) परिसरात घडली. अमीत रवींद्र पंधराम (वय २६, रा. धानोली (गावंडे), जि. वर्धा) असे मृत तरुणाचे असून अमित व जखमी गजानन सलाम हे मामा-भाचे आहे.

मृतक अमित हा सोमवारी आईसोबत चिमूर येथील नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम – आटोपून परतीच्या प्रवासात त्यांनी कांढळी -(ता. समुद्रपूर) येथील जखमी गजानन सलाम यांच्याकडे मुक्काम केला. मंगळवारी सकाळी अमीत आणि मामा गजानन हे एमएच ३२/एबी-४८२७ क्रमांकाच्या दुचाकीने नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव (लोधी) येथे चिकन आणण्यासाठी जात होते. दरम्यान, सोनेगाव येथील डिव्हाइडर कटजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या जबर धडकेत दोघेही रस्त्यावर फेकल्या गेले.

आरोपी चालकाविरुद्ध बेला पोलिसात गुन्हा

या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अमीतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गजानन गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचारासाठी हिंगणघाट येथील रुग्णालयाकडे हलविण्यात आले. या प्रकरणी मृत अमीतचा चुलतभाऊ विशाल अशोक पंधराम याच्या तक्रारीवरुन बेला पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरु आहे.

Source – नवराष्ट्र Metro

| 18 November 2026 |

Page 5

संबंधित बातम्या