Monday, 23 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बोरखेडी (रेल्वे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवाळी स्नेहमीलन सोहळा उत्साहातबुटीबोरीत सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजेरीचा निनाद; प्रबोधनाच्या जागराने श्रोते मंत्रमुग्ध!वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यूक्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ४ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमीबुटीबोरी में राष्ट्रीय पत्रकार दिवस उत्साह के साथ मनाया गया, पत्रकारों को पौधे देकर दी शुभकामनाएंबुटीबोरी में दर्दनाक हादसा: दस्तावेज़ों की गलती से परेशान डी.फार्मा छात्रा ने की आत्महत्या
BUTIBORI NEWS

बोरखेडी (रेल्वे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवाळी स्नेहमीलन सोहळा उत्साहात

Aamchibutibori_admin
23 Nov 202681 वाचने

बुटीबोरी : नागपूर तालुक्यातील बोरखेडी (रेल्वे) येथे माजी उपसभापती संजय चिकटे व मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दिवाळी स्नेहमीलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या १४ वर्षांची परंपरा कायम राखत आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री सुनील केदार, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सुनील केदार यांनी महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारवर टीका केली. तसेच बोरखेडी (रेल्वे) येथील जलजीवन मिशनअंतर्गत १४ कोटी रुपयांची प्रलंबित पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी सुनील केदार यांच्या हस्ते संजय चिकटे यांचा सामाजिक व विकासात्मक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपचंद कांबळे यांनी केले, प्रास्ताविक संजय चिकटे यांनी तर आभार देवकी इवनाते यांनी मानले.

संबंधित बातम्या