Thursday, 19 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यूक्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्र. ४ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन!अपघातात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमीबुटीबोरी में राष्ट्रीय पत्रकार दिवस उत्साह के साथ मनाया गया, पत्रकारों को पौधे देकर दी शुभकामनाएंबुटीबोरी में दर्दनाक हादसा: दस्तावेज़ों की गलती से परेशान डी.फार्मा छात्रा ने की आत्महत्याईमानदारी की मिसाल बने तंजील पठाण! लाखों का कीमती सामान मिला, फिर भी नहीं डगमगाया ईमान; PI निशांत मेश्राम के मार्गदर्शन में मालिक को लौटाया पर्सपतंग उडवायला गेलेला बालक परतला नाही! शेतात विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; बुटीबोरी पोलीस ठाण्या हद्दीतील घटना
BUTIBORI NEWS

वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Aamchibutibori_admin
19 Nov 202666 वाचने

बुटीबोरी (नितीन कुरई): शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्यवृद्धीसह बदलत्या शैक्षणिक प्रवाहांची माहिती देण्यासाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम हिंगणा येथील जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सुरू असून, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शैक्षणिक सेवेत १२ वर्षे पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी, तर २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड वेतन श्रेणीसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण, शैक्षणिक आराखडा,अभ्यासक्रमातील बदल, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक विविध उपक्रमांची माहिती दिली जात आहे.
प्रशिक्षणासाठी ४० शिक्षकांची एक तुकडी तयार करण्यात आली असून,दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.सुलभक धनराज राऊळकर सर.अनिल मा.कुमरे, सौ.वैशाली सावरकर आणि छाया काळे मॅडम व तसेच ईतर सुलभक यांनी विविध विषयांची सविस्तर व प्रभावी मांडणी करून सुमारे १६० जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले. गेल्या सहा दिवसांत विविध कृती,चर्चासत्रे आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे सत्र उत्साहात पार पडले.
दरम्यान, मा.सुधाकर आडबले – माजी शिक्षक आमदार, मा.मंगला गजभिये (शि.वि. अधिकारी),केंद्रप्रमुख- राजू भराडे सर आणि रामकृष्ण ढोले सर यांनी प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधला. त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक प्रवाहांचा स्वीकार करून अध्यापन अधिक प्रभावी करण्याचे आवाहन केले.

संबंधित बातम्या