Wednesday, 11 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
भीमकुंड येथे वनराई बंधारानिर्मितीदिवाली के पावन अवसर पर बुटीबोरी के वार्ड क्रमांक 7 में पहली बार माँ दुर्गा काली की स्थापना, भक्तों में उत्साह का माहौलशुभ दीपावलीच्या पावन पर्वावर ‘मराठा लायन्स’ परिवारातर्फे बुटीबोरीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये छत्रपती संभाजी महाराज व भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादनबालाजी कॉन्व्हेन्टचा स्तुत्य उपक्रम: ‘करा दान, मिळवा समाधान’ अंतर्गत बुटीबोरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!बुटीबोरी की जुनी वसाहत में कबाड़ के ढेर में लगी भीषण आग; दमकल विभाग की तत्परता से टला बड़ा हादसा!बुटीबोरीत ‘जाणीव माणुसकीची’ उपक्रमातून गरजूंना कपड्यांचे वाटप; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश!पंचशील आचरणाने स्वतःचे जीवन घडवा : भदंत प्रज्ञानंदधनतेरस पर बुटीबोरी के मुख्य बाजार में उमड़ी खरीदारों की भीड़, छोटे व्यापारियों के चेहरे खिले!
BUTIBORI NEWS

भीमकुंड येथे वनराई बंधारानिर्मिती

Aamchibutibori_admin
11 Nov 202658 वाचने

बुटीबोरी -पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. हाच संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी रोडवरील भीमकुंड येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. जगद्‌गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य यांच्या कृपाशीर्वादाने व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य श्री कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी माधवी ठाकूर, मंजुश्री डाहाके, मनीषा पुंड, कल्पना शरद हेडाऊ, जगदीश फालके, प्रमोद चौधरी, अभिषेक कुलकर्णी व इतरांनी पुढाकार घेतला होता.

संबंधित बातम्या