Thursday, 26 November 2026AAMCHI BUTIBORI NEWS
AAMCHI BUTIBORI NEWS
BREAKING NEWS
बुटीबोरी येथील शासकीय आयटीआयमध्ये कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्नकाठमांडू येथे भारताला सुवर्णपदक; बुटीबोरीच्या (भारकस) दोन्ही सुपुत्रांची सुवर्णकामगिरी!काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय शूटबॉल स्पर्धेसाठी भारकस येथील दोन खेळाडूंची निवड!बुट्टीबोरी मध्ये वर्धापन दिनानिमित्त आर्थिक बचतीवर मार्गदर्शनबोरखेडी (रेल्वे) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा दिवाळी स्नेहमीलन सोहळा उत्साहातबुटीबोरीत सत्यपाल महाराजांच्या सप्तखंजेरीचा निनाद; प्रबोधनाच्या जागराने श्रोते मंत्रमुग्ध!वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी शिक्षकांचे दहा दिवसीय प्रशिक्षण सुरू नवीन शैक्षणिक धोरण, अध्यापन पद्धती व शैक्षणिक गुणवत्तावाढीवर मार्गदर्शन; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसादभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार भाच्याचा मृत्यू
BUTIBORI NEWS

काठमांडू येथे भारताला सुवर्णपदक; बुटीबोरीच्या (भारकस) दोन्ही सुपुत्रांची सुवर्णकामगिरी!

Aamchibutibori_admin
26 Nov 202674 वाचने

# आंतरराष्ट्रीय फर्स्ट शूटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळला १५-६ ने धूळ चारली # दिशांत जोडे व टाकेश्वर धुर्वे यांनी मिळवून दिले देशाला सुवर्णपदक; प्रशिक्षक विक्रम परमार यांच्या मार्गदर्शनाला यश

बुटीबोरी (नागपूर) :- नेपाळमधील काठमांडू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय फर्स्ट शूटबॉल स्पर्धेत भारताच्या संघाने नेपाळचा १५-६ असा दणदणीत पराभव करत सुवर्णपदकावर (गोल्ड मेडल) आपले नाव कोरले आहे. या ऐतिहासिक विजयात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरमिटी भारकस (बुटीबोरी एमआयडीसी, ता. हिंगणा, जि. नागपूर) येथील दिशांत प्रवीण जोडे आणि टाकेश्वर रोहित धुर्वे या दोन्ही खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली आहे.

या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत साखळी सामन्यांमध्ये श्रीलंका आणि भूतान या संघांना पराभूत करून अंतिम फेरीत (फायनल) धडक मारली होती. अंतिम सामन्यात यजमान नेपाळशी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारताने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत १५ गुण मिळवले, तर नेपाळला केवळ ६ गुणांवर रोखत सुवर्णपदक पटकावले.

ग्रामीण भागातील मातीतून पुढे येऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्याबद्दल दिशांत आणि टाकेश्वर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे प्रशिक्षक विक्रम परमार यांचे मोलाचे मार्गदर्शन व मेहनत कारणीभूत ठरली आहे. दोन्ही खेळाडूंच्या या सुवर्णकामगिरीमुळे किरमिटी भारकस, बुटीबोरी आणि संपूर्ण हिंगणा तालुक्यासह नागपूर जिल्ह्यात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित बातम्या